अल्पवयीन पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवल्यास बलात्कार – सुप्रीम कोर्ट

अल्पवयीन पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवल्यास बलात्कार – सुप्रीम कोर्ट

अल्पवयीन पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवल्यास तो बलात्कार समजला जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अशा प्रकरणांत संबंधित पत्नीने एक वर्षाच्या आत तक्रार दाखल केल्यास पतीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. 15- 18 वयोगटातील पत्नीशी शारीरिक संबंध आता बलात्कारच समजला जाणार आहे. आयपीसीच्या 375 कलमात 15 वर्षावरील पत्नीशी शारिरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही अशी तरतूद होती. याविरूद्ध एका एनजीओने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

लग्नासाठीचे वय 18 वर्ष निश्चित केले असताना संसद कलम 375(2) हा अपवाद कसा काय तयार करु शकते, असा सवाल 6 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने विचारला होता. त्यावर बाल विवाह हे या देशातील वास्तव आहे, असे सांगत केंद्र सरकारने 375(2) या कलमाचे समर्थन केले होते. मात्र, न्यायालयाने हा युक्तीवाद फेटाळून लावला आहे.

COMMENTS