जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करावे या मागणीसाठी सत्ताधारी भाजपवरच पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याची वेळ आलीय.
सट्टा, मटका, जुगार, गावठी मद्यविक्रीसह अनेक अवैध धंद्यांचे धरणगावसह तालुका जणू आगर झालाय, अवैध व्यवसायामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली असून पोलिसांनी सर्व अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर घंटानाद आंदोलन केलं.
अवैध व्यावसायिकांना शिवसेना नेत्यांचं अभय असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय. दरम्यान आठ दिवसांत अवैध धंदे बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप न दिलाय.
COMMENTS