नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर दररोज अनेकजण आंदोलन करत असतात. कुणी सरकारच्या नावाने तर कुणी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतात. मात्र लग्न करण्यासाठी कुणी जंतरमंतरवर धरणे धरुन बसल्याचे पहिल्यांदाच घडत आहे. या मैदानावर एक महिला गेल्या महिनाभरापासून धरणे धरुन बसली असून तिला चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लग्न करायचे आहे.
राजस्थान जयपूर येथे राहणाऱया ओम शांती शर्मा (40) या 8 सप्टेंबरपासून जंतरमंतरवर धरणे धरुन बसल्या आहेत. मोदींना आवाहन करणारे एक मोठे पोस्टर घेऊन ती तेथे बसली आहे. त्यात तिने आपली मोदींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ओम शांती शर्मा म्हणाल्या, ‘मोदींमध्ये भगवान राम दिसतात. मोदी मन की बात करतात. मोदींजी माझ्या मनातील समजून घ्यावं. नवीन राष्ट्रपती निवडणूकवेळी मोदी माझा स्वप्नात आले होते. स्वप्नात येऊन मोदीजी म्हणाले लग्न करायचंय लग्ना शिवाय मोक्ष नाही. मला एक मुलगी आहे. मुलीला पण राहुल गांधी यांच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. दोन्ही पक्षाला समान न्याय मिळायला हवा.’ असं ओम शांती शर्मा म्हणाल्या.
‘जो पर्यंत मोदीजी इथे येऊन माझी भेट घेत नाहीत तोपर्यंत मी इथे अशीच बसून राहणार.’ असे ओम शांती शर्मा म्हणाल्या आहेत.
COMMENTS