आजची मध्यरात्र स्वातंत्र्य, लोकशाहीच्यादृष्टीने काळरात्र ठरेल – ममता बॅनर्जी

आजची मध्यरात्र स्वातंत्र्य, लोकशाहीच्यादृष्टीने काळरात्र ठरेल – ममता बॅनर्जी

देशातील स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्यादृष्टीने 30 जून 2017 म्हणजेच आजची मध्यरात्र ही काळरात्र ठरेल, अशा शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (शुक्रवारी) केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.

आजची मध्यरात्र ही देशातील स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्यादृष्टीने  काळरात्र ठरेल. त्यामुळे देशात इनस्पेक्टर राज पुन्हा परतेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. तसेच जीएसटी कायद्यातील एखाद्याला अटक करण्याचे कलम सरकारी धोरणांना विरोध करणाऱ्या उद्योगपतींचा विरोध दाबण्यासाठी असल्याचा आरोप ममता यांनी केला. सध्या देशात सरकारला विरोध करणाऱ्यांना निष्ठुरपणे चिरडून टाकणारे वातावरण अस्तित्त्वा आहे. त्याची मला खूप चिंता वाटते, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

आज मध्यरात्री बरोबर 12 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधील भव्य सोहळ्यात जीएसटीचा शुभारंभ होत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान डॉ. सिंग, एच.डी. देवेगौडा यांच्यासह देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना, खासदारांना, राज्याराज्यांच्या अर्थमंत्र्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.

COMMENTS