दिल्ली – देशभरातील राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आज एकदिवसीय संप पुकारला आहे. देशभरातील 56 बँकांच्या 17 हजार शाखेतील लाखो अधिकारी आणि कर्मचारी आज संपावर जाणार आहेत. त्यामुळे आज बँका बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने आजच्या देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे.
बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स एसोसिएशनचे महासचिव दिलीप सिंह चौहान म्हणाले की, सरकारच्या विविध बँकविषयक धोरणाला विरोध करण्यासाठी या संपाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारीही बँक अधिकाऱ्यांनी संप केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
COMMENTS