महापालिका निवडणुकीतील पराभवाचे पडसाद आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांडूनच होत असलेली नेते-सरचिटणीस फेरबदलाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज तातडीची बैठक होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे. मात्र, राज ठाकरें हे उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे.
चिंतन बैठकीत उमटलेले महापालिका निवडणुकीतील पराभवाचे पडसाद आणि त्यानंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांडूनच होत असलेली नेते-सरचिटणीस फेरबदलाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा तातडीनं महत्वाची बैठक होत आहे. पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय ‘राजगड’वर ही बैठक होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत पक्षांतर्गत झालेल्या घडामोडींमुळे मनसे पुन्हा चर्चेत आलीय. ‘कृष्णकुंज’ आयोजित बैठकीत राज ठाकरे विरुद्ध नेते- सरचिटणीस अशी खडाजंगी झाली होती. महापलिका निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याचा प्रयत्न झाला होता. तर पक्षाचे प्रवक्ते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे आणि मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नेते-सरचिटणीस फेरबद्लाची मागणी राज ठाकरे यांच्याकडे काल केली आहे.
COMMENTS