आडवाणी यांना अटक करणारे अधिकारी मोदींच्या मंत्रिमंडळात !

आडवाणी यांना अटक करणारे अधिकारी मोदींच्या मंत्रिमंडळात !

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी करण्यात आला. मोदींच्या या मंत्रिमंडळात एकूण 9 जणांना संधी देण्यात आली तर 4 राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर प्रमोशन देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात माजी सनदी अधिकारी राजकुमार सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. राजकुमार सिंह यांनी 1990 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रा काढली होती. तेव्हा राजकुमार सिंह यांनी आडवाणींना समस्तीपूरमध्ये अटक केली होती. आणि त्यांनाच मंत्रिमंडळात घेण्याची भाजपवर वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजकुमार सिंह यांना ऊर्जा राज्यमंत्रीपदाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे.

2013 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या तिकीटावर ते बिहारच्या आरा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले.  राजकुमार सिंह यांनी आयएएस अधिकारी म्हणून चार दशके चांगले काम केले आहे. 1990 मध्ये लालूप्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री असताना राजकुमार सिंह यांच्यावर आडवाणी यांना अटक करण्याची जबाबदारी सोपविली होती. त्यावेळी आडवाणी यांची सोमनाथ ते आयोध्या रथयात्रा सुरू होती. बिहारच्या समस्तीपूर येथे आडवाणींची रथयात्रा आल्यावर राजकुमार सिंह यांनी त्यांना अटक केली होती.

COMMENTS