मी काही राजकीय नेत्यांसोबत चर्चा केली आहे. राजकीय नेत्यांना भेटल्याचे मी नाकारत नाही. आम्ही चर्चा करत आहोत आणि याबद्दल निर्णय झाल्यावर त्याची घोषणा करण्यात येईल, असे रजनीकांत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून रजनीकांत राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यावर रजनीकांत यांनी आज स्पष्टीकरण दिले. राजकारणातील प्रवेशाबाबत निर्णय घेतल्यानंतरच याची घोषणा केली जाईल, असे रजनीकांत म्हणाले.
दरम्यान, काही दिवसापुर्वीच सुरुवातीला रजनीकांत यांनी हिंदू मक्कल कातची संघटनेच्या सदस्यांची निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चांना उधाण आले आहे.
COMMENTS