…आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने महापौर, आयुक्तांना कुंडी फेकून मारली  !

…आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने महापौर, आयुक्तांना कुंडी फेकून मारली !

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांच्या अंगावर धावून जात गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षनेत्यासह राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचे निलंबन झाल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीने आकांडतांडव केले.  

महापालिकेत लोकशाहीचा खून झाला, असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादीचा खरा चेहरा एका फोटोमुळे समोर आला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने हे महापौरांच्या आसनाशेजारील झाडाची कुंडी उचलून फेकण्याचा प्रयत्न करतानाचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. सुरक्षारक्षकांनी साने यांचा प्रयत्न हाणून पाडला नसता, तर ही कुंडी महापौर आणि आयुक्तांच्या अंगावर पडली असती. त्यामुळे राष्ट्रवादीची ही कसली दादागिरीची लोकशाही?, असा सवाल शहरातील जनतेला पडला आहे.

राज्य सरकारने 600 चौरस फुटापर्यंच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर रद्द करण्याचा अध्यादेश काढला आहे. त्याचे अवलोकन करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला होता. सत्ताधारी भाजपने त्याला उपसूचना देत एक हजार चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शस्तीकर रद्द करण्यास सभेत मंजुरी दिली. तत्पूर्वी या विषयावर सांगोपांग चर्चा झाली.

दरम्यान, काल(दि.20) पिंपरी-चिंचवड महापालिके सर्वसाधरण सभा पार पडली. त्यावेळी 100 टक्के शास्तीकर माफ करण्याच्या मुद्यावरुन गोंधळ घातल्याच्या ठपका ठेवत भाजपने विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, दत्ता साने, मयुर कलाटे यांना तीन सर्वसाधारण सभेसाठी निलंबित केले  होते.

COMMENTS