नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाच्या 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने बंद करण्यासंदर्भातील आदेशात दुरूस्ती केली असून महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यांवर असलेल्या परवानाधारक दारू दुकानांसाठी हा आदेश लागू होणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर असलेली दारू दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा आदेश सरन्यायाधीश जे. एस. केहर, न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. नागेश्वर राव यांनी लागू केला आहे.
महामार्गावर होणारे अपघात आणि त्यामधील मृत्यू यांचे प्रमाण लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने 15 डिसेंबर 2016 रोजी केंद्र आणि राज्य सरकारांना राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या 500 मीटर परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला सुधारणा करून सुप्रीम कोर्टाने हा नवा निर्णय दिला आहे. दारूबंदीच्या कचाटय़ातून सुटण्यासाठी राज्य सराकरने तात्काळ काही रस्ते स्थनिक प्रशासनाला हस्तांतरित केले होते. मात्र आता सुप्रीम कोर्टाने ही बाब स्पष्ट करून सांगितली आहे.
COMMENTS