लखनऊ – उत्तर प्रदेशमध्ये शिया समुदायाच्या मुस्लिमांना शिया गो-रक्षा दलाची स्थापना केली आहे. हे दल गोहत्या बंदीबाबत मुस्लिमांमध्ये जनजागृती करुन त्यांना गो हत्या करण्यासापासून रोखणार आहे. या आधी बुधवारी ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये मुस्लिमांनी गोहत्या करणे आणि गाईचे मांस खाणे हराम असल्याचं सांगत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. शिया पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना मिर्झा मोहम्मद अशफाक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत योगी सरकारने गोहत्या बंदीबाबत घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. याच बैठकीत गोहत्यासोबतच मुस्लिम समाजातील तलाकला जोरदार विरोध करण्यात आला. तलाकची प्रथा बंद करण्यासाठी केंद्र सरकारने सती प्रथा बंद करण्यासाठी जसा कठोर कायदा केला आहे तसा कठोर कायदा करावा अशी मागणी करण्यात आली.
Newer Post
तुकाराम मुंढेंचा आणखी एक दणका Older Post
या अभिनेत्याने विकत घेतला ‘किंगफिशर व्हिला’
COMMENTS