‘आता सुधीर मुनगुंटीवार फक्त खर्चमंत्री’

‘आता सुधीर मुनगुंटीवार फक्त खर्चमंत्री’

वस्तू आणि सेवा कर विधेयक विधानसभेत मांडण्यात आले असून त्यावर आज चर्चा होत आहे. विधान विधानसभेत जीएसटीवर चर्चा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सुधीर मुनगुंटीवार यांच्यावर जोरदार टीका केली.

‘आता सुधीर मुनगुंटीवार यांना कोणतेही नियोजन करण्याचा अधिकार नाही,  त्यामुळे ते नियोजन मंत्री नाहीत.तसेच त्यांना कोणताही कर लावण्याचा अधिकार नाही. त्यामुळे ते अर्थमंत्रीही नाहीत आता हे फक्त खर्चमंत्री आहेत त्यामुळे यांच्या खात्याचे नाव बदला’. अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली .

दरम्यान, जीएसटी विधेयकाबाबत शिवसेनेची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडून पूर्ण करण्यात आल्या होत्या. शिवसेनेच्या मागणीनुसार राज्याच्या जीएसटी कायद्यात सुधारणा करण्यात आली होते.

COMMENTS