नवी दिल्ली – जुन्या 500 आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा जाऊन त्याच्या जागी नव्या 500 आणि 2000 हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्यानंतर आता आरबीआय नव्या 200 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची शक्यता आहे. आरबीआय येत्या जुननंतर ही 200 रुपयांची नवी नोट वापरात आणण्याची शक्यता आहे. सरकारची परवानगी मिळाल्यानंतर येत्या जूनपासून ही नोट छापली जाण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. गेल्या महिन्यात आरबीआयने देशातील ५ भागात १० रूपयांची प्लास्टिक नोटांची चाचणी सुरू केली आहे. ही या चाचणी यशस्वी झाल्यानंतर इतर नोटाही प्लास्टिक चलनाच्या माध्यमातून सादर केल्या जाऊ शकतात.
COMMENTS