पुणे – मुंबईत झालेल्या रेल्वे स्टेशनवरील चेंगरा चेंगरीनंतर सरकारच्या महत्वकांक्षी बुलेट ट्रेनवर चौफेर टीका होत आहे. सोशल मीडियातून आणि राजकीय वर्तुळातून बुलेट ट्रेनवर जोरदार टीका होत आहे. राज ठाकरे, शिवसेना, काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही विरोधाचा सूर आळवला आहे. आधी मुंबईतील लोकलसेवा सुरळीत होऊ दे नंतर बुलेट्रनचं बघा अशा शब्दात राष्ट्रावादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकावर निशाणा साधला आहे. आधी मुंबईकरांना वरण भात व्यवस्थीत द्या नंतर पुरणपोळीचं बघा असा टोला सुप्रिया सुळे यांनी सरकारला लगावला आहे.
COMMENTS