पैठण- औरंगाबादच्या पैठणमध्ये राज्य संवाद यात्रेच्या निमित्तानं भाजप आमदार अतुल सावे यांनी शेतक-याशी संवाद साधला. एका शेतक-यानं आमदार सावे यांना रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर उत्तर देण्याची मागणी केली. त्यावेळी शेतक-यानं या प्रश्नावर सावे यांनी शेतक-याला चांगलच सुनावलं. ‘मागच्या सरकारने तुम्हाला काय दिलं, आम्ही देतोय त्याचं काही नाही का ? आमचा संवाद ऐकून घ्यायचा नसेल तर चालते व्हा’, अशी अर्वाच्च भाषेत आमदार अतुल सावे हे सवाल विचारणार्या शेतकर्यांवर खेकसले. पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे शिवार संवाद बैठकीदरम्यान हा प्रकार घडला. या प्रकाराच्या व्हिडिओ समोर आला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकारून शेतमालाला हमी भाव द्यावा, ठिबक सिंचनासाठी 75 टक्के अनुदान देण्यात यावे, शेततळ्यासाठीचे अनुदान 50 हजारावरून किमान 75 हजार रुपये करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
अडीच वर्षांत शेतकऱ्यांना 49 हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या असून जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे अावाहन आमदार सावे यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. आमदार अतुल सावे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर सर्वात जास्त फायदा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचाच होईल. 33 हजार कोटींपैकी एकट्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर 28 हजार कोटींचे कर्ज आहे. तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर पाच हजार कोटींचे कर्ज आहे, असे आमदार अतुल सावे यांनी सांगितले.
COMMENTS