मुंबई – राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ज्यांना शिवसेनेची मते हवी आहेत त्यांनी चर्चेसाठी मोतीश्रीवर यावं असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. राष्ट्रपती सक्षम असावा, घटनेचं त्यांना पूर्ण ज्ञान असावं आणि तो प्रखर राष्ट्रवादी असावा अशी शिवसेनेची भूमिका आहे.
या पूर्वी दोन निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांनी देश हितासाठी प्रवाहापासून उलट भूमिका घेतली होती. त्यामुळे ज्यांना आमच्या मतांची गरज आहे त्यांनी चर्चा करायला मातोश्रीवर यावे, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा द्यावा यासाठी भाजपनं उद्धव ठाकरेंना प्रिती भोजनाचं आमंत्रण दिल्याची चर्चा माध्यमातून आहे. त्यावर संजय राऊत यांनी भाजपला हा चिमटा घेतला आहे. प्रीतीं भोजनाचं निमंत्रणाचं कार्ड आमच्यापर्यंत आलेलं नाही असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मोहन भागवतांचं नाव राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत आहे. हा हिंदुराष्ट्र या संकल्पनेसाठी उत्तम पर्याय असू शकतो. मात्र याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असंही राऊत यांनी सांगितलं.
COMMENTS