नांदेड – ‘सरकारला शिवसेनेची मागणी मान्य करावी लागली. पण मी श्रेय घेणार नाही. आमच नातं खुर्चीशी नाही तर शेतकऱ्याशी आहे.’ असं मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेड व्यक्त केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहे. यावेळी नांदेडमधील तरोडा नाका येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
कर्जमुक्तीचा निर्णय झाला, पण कर्जमुक्ती झाली नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती होणार नाही तोपर्यंत शेतकरी शिवसेना गप्प बसणार नाही. कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का हे आपल्याला पहावं लागेल. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
जी लोकं म्हणत होती की मोबाईलचं बिल भरायला पैसे आहेत मग वीजबिल का भरता येत नाही, जी लोकं शेतकऱ्यांना साले म्हणत होती, जी लोकं कर्जमुक्ती ही आजकाल फॅशन झालीय असं म्हणत होती त्यांच्याकडूनच शिवसेनेने कर्जमाफी करवून घेतली. शिवसेनेवर टीका करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीने संघर्ष यात्रा काढली पण त्याने काय झालं ? असा सवालही त्यांनी विचारला.
COMMENTS