भोपाळ – राष्ट्रीय स्वंयवसेवक संघाला तोंड देण्यासाठी आता राष्ट्रीय काँग्रेस स्वंयसेवक संघाची स्थापना करण्यात आली आहे. या नव्या स्वंससेवक संघाचे कार्यक्षेत्र हे सध्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्येच असणार आहे. या नव्या संघात काँग्रेस विचारणी मानणा-या लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. राजकारणाबाहेर असलेले सुशिक्षीत, नोकरदार, छोट मोठे व्यावसायीक अशांना यामध्ये सहभागी करुन घेतलं जाणार आहे. मात्र त्यांची धर्मनिरपेक्ष विचारसणीवर निष्ठा असायला हवी. माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलम शेर खान यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना याची माहिती दिली. ते म्हणाले, संपूर्ण देशभरात आरएसएसने आपला विस्तार केला आहे. ते भाजपसाठी काम करतात. पण आमचा संघ हा (आरसीएसएस) हा धर्मनिरपेक्ष लोकांचा संघ असेल. आरएसएस ज्यापद्धतीने भाजपसाठी काम करते त्याच धर्तीवर हा संघ धर्मनिरपेक्ष विचारधारा वाढवण्यासाठी काम करेल, असेही ते म्हणाले.
देशातील धर्मनिरपेक्ष राजकारण संपुष्टात आणण्याचे काम उत्तर प्रदेशमध्ये झाले आहे. त्यासाठी नव्या युगाची सुरूवात करणे आवश्यक होती. या संघात काम करू इच्छिणाऱ्यांना फक्त धर्मनिरपेक्ष विचारधारा अर्थात काँग्रेसची विचारधारा मानणे गरजेचे आहे. ते जेथे आहेत (शिक्षक, डॉक्टर, नोकरी, व्यवसाय आदी) तेथे राहूनच या विचारधारेसाठी काम करू शकतात. आरसीएसएसबाबत आपण पक्षाच्या हायकमांडशी चर्चा केली नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. परंतु, आपल्या निर्णयावर हायकमांड खूश होतील, असा विश्वास व्यक्त केला.
COMMENTS