ब्राह्मण समाजातील मुले परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे आणि तेथेच स्थायिक होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. याला कारणीभूत देशातील आरक्षणाची स्थिती आहे असे वादग्रस्त विधान पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केले.
चित्तपावन ब्राह्मण संघाच्या वतीने आयोजित श्री परशुराम वेद पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. कुशाग्र बुद्धीमत्तेला मायदेशी परत आणण्याची तसेच त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्याची गरज असून त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं मतदेखील त्यांनी व्यक्त केलं. ब्राह्मण समाज वेगवेगळ्या शाखांमध्ये विखुरला आहे. या समाजाने एक होणे ही काळाची गरज असून अंतर्गत भेद बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्रित यावे तसेच रोटी बेटी व्यवहार सुरू करावेत असे आवाहनसुद्धा त्यांनी केले.
या वक्तव्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज दुपारी चार वाजता महापौरांच्या केसरी वाड़ा नारायण पेठ या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्षा वंदना चव्हान यांनी सांगितले.
COMMENTS