“इंदिरा गांधी 20 व्या शतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्व”

“इंदिरा गांधी 20 व्या शतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमत्व”

दिल्ली – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या 20 व्या शतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती होत्या अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. इंदिरा गांधी यांच्यावरील एका पुस्तकाचं प्रकाशन आज राष्ट्रपतींच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्य सांगताना त्यांच्या निर्णय क्षमता आणि खंबीरपणा याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. १९७७ मध्ये काँग्रेसचा पराभव झाला. त्यावेळी मी कनिष्ठ मंत्री होतो. मला इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की पराभवाने खचून जाऊ नका, आता काम करण्याची वेळ असून त्यांनी ते करुन दाखवले होते असे मुखर्जींनी सांगितले. १९७८ मध्ये काँग्रेसचे विभाजन झाल्यावर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील विजयाची आठवण त्यांनी याप्रसंगी करुन दिली. १९७८ मध्ये काँग्रेसचे विभाजन झाले होते. इंदिरा गांधी यांना पक्षाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले. पदभार स्वीकारल्यावर २० दिवसांमध्येच त्यांनी त्यांच्या टीमची निवड केली होती. पक्षाला महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, आसाम या राज्यांमधील निवडणुकीसाठी तयार केले अशी आठवण त्यांनी सांगितले. राजकारणातील सर्वात कठीण काळात इंदिरा गांधींनी स्वतःला कामात व्यस्त ठेवले होते असे त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी इंदिरा गांधीवर पुस्तक लिहीले असून यात त्यांचे कार्य आणि आयुष्यातील घटनाक्रमांचा मागोवा घेतला आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, उपराष्ट्रपती हमिद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे उपस्थित होते.

COMMENTS