“इस्लाम धर्माचा स्वीकार करा अन्यथा परिणामांना सामोरे जा”

“इस्लाम धर्माचा स्वीकार करा अन्यथा परिणामांना सामोरे जा”

केरळमधील प्रसिद्ध मल्याळी लेखक के.पी. रामानुन्नी यांना धमीचे पत्र आले आहे. सहा महिन्याच्या आत इस्लाम धर्माचा स्वीकार करा. अन्यथा तुमचा डावा हात आणि उजवा पाय कापून टाकू,  असे रामनुन्नी यांना पाठविलेल्‍या धमकी पत्रात म्‍हटले आहे. याबाबत रामानुन्नी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

रमनउन्नी कोझिकोड येथे राहतात. रमजानच्या काळात त्यांनी काही लेख लिहिले होते. हिंदू मुसलमानांचे शत्रू नाहीत, असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले होते. रमजानच्या काळात आपल्या लेखाचे इतके कौतुक झाले होते. पण अचानक असे काय झाले की मला धमकी येऊ लागली, असा प्रश्न रमनउन्नी यांना पडला आहे. रमनउन्नी यांना प्रोफेसर टी.जी.जोसेफ यांच्यासारख्या परिणामांना सामोरे जाण्याची धमकी देण्यात आली आहे. 2010मध्ये जोसेफ यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांचा हात कापण्यात आला होता.

कोझीकोड येथील घराच्या पत्त्यावर सहा दिवसांपूर्वी हे धमकी पत्र आले होते. या पत्रामागे कोण आहे याबाबत अद्याप काहीच संकेत मिळालेले नाही. पण, ते मलप्पुरम जिल्ह्याच्या मनजेरी येथून पाठण्यात आलेले आहे. या पत्रामागील हेतूची मला काहीच कल्पना नसून, मी कोझीकोड शहर पोलिस आयुक्तांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली असल्‍याचे के.पी. रामानुन्नी यांनी सांगितले आहे.

COMMENTS