उत्तर प्रदेश विधानसभेत सापडली स्फोटके; संसद भवन परिसरात सुरक्षेत वाढ

उत्तर प्रदेश विधानसभेत सापडली स्फोटके; संसद भवन परिसरात सुरक्षेत वाढ

उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत शक्तीशाली स्फोटक पाऊडर सापडल्यानंतर संसद भवन परिसरात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. लोकसभा, राज्यसभा आणि सेंट्रल हॉल यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला आहे.

PETN नावाची ही स्फोटके असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरक्षेसंबंधी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. गुरुवारी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सुरक्षा रक्षकांना व्हाइट पाऊडर सापडली. त्यानंतर डॉग स्कॉडकडून संपूर्ण सभागृहाची तपासणी करुन घेण्यात आली. सभागृहात सापडलेले पाऊडर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते, त्यात हा स्फोटकांचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे. यावर विधानसभेत निवदेन करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की अवघ्या 500 ग्रॅम स्फोटकांनी संपूर्ण विधानसभा उडाली असती.

 

COMMENTS