उदयनराजेंच्या अटकेचे विधानसभेत पडसाद

उदयनराजेंच्या अटकेचे विधानसभेत पडसाद

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे साता-याचे आमदार उदयनराजे भोसले यांच्या अटकेचे पडसाद विधानसभेत उमटले. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभुराज देसाई यांनी उदयनराजे यांच्यावरील कारवाई थांबवण्याची मागणी केली. छत्रपतींचे नाव घेऊन राज्य करतो, त्यांच्या वंशजाला खोट्यागुन्हाखाली अटक केली आहे. उदयनराजे यांची पार्श्वभूमी पाहिली तर ते असे करु शकत नाहीत. त्यामुळे त्यांना झालेली अटक ही चुकीची असल्याचं  सांगत त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. उदयनराजे यांच्यावर जी अकटकेची कारवाई झाली आहे ती त्वरीत थांबवण्याची मागणीही त्यांनी केली.

COMMENTS