उद्धव ठाकरेंचं धारधार भाषण, आमदारांचं समाधान, शिवसैनिकांची मात्र निराशा !

उद्धव ठाकरेंचं धारधार भाषण, आमदारांचं समाधान, शिवसैनिकांची मात्र निराशा !

मुंबई – दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरादार टीका केली. फसलेली नोटबंदी, फसलेला जीएसटीचा निर्णय, गोहत्याबंदीवरुन सरकारची दुटप्पी भूमिका, महागाई, पेट्रोल, डिझेलची दरवाढ, शेतकरी कर्जमाफी, तरुणांच्या पदरी पडलेली निराशा, जेएनयूमधील विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवण्याचे प्रकार, हार्दिक पंड्याला देशद्रोही ठरवण्याचे प्रकार, काश्मीर प्रश्नावरुन भाजपची दुटप्पी भूमिका, बुलेट ट्रेनचा प्रश्न, समृद्धी महामार्ग या सर्व प्रश्नांवरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सत्तेवर आल्यानंतर भाजपविरोधातलं सर्वात धारधार भाषण म्हणून या भाषणाचं विश्लेषण करता येईल.

उद्धव ठाकरेंच्या या सर्वात धारधार भाषणाने शिवसैनिकांचे समाधान झाले असेल अशी शक्यता कमीच आहे. गेल्या काही दिवसात सोशल आणि इतर माध्यमातून शिवसेनेची भूमिका स्पष्ट होत होती. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता अंतिम निर्णयाच्या जवळ आलो आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे या दसरा मेळाव्यात शिवसेना मोठा राजकीय निर्णय घेईल अशी शक्यता वर्तविली जात होती. सत्तेतून बाहेर पडावे असाच सूर शिवाजी पार्कवर जमलेल्या आणि राज्यात कानाकोप-यात उद्धव यांचे भाषण ऐकणा-या शिवसैनिकांचा होता. मात्र शिवसैनिकांची अपेक्षा फोल ठरली. भाजपा इशारा देण्याच्या पलिकडे काहीही झालं नाही. एकच फक्त आम्ही कधीही योग्य निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ज्या अपेक्षेने शिवसैनिकाला निर्णय अपेक्षीत होता तो झाला नाही. त्यामुळे शिवसैनिक निराश झाल्याचीच चर्चा होती.
सत्तेतून लगेच शिवसेनेने बाहेर पडू नये अशी मागणी काही आमदारांनी केली होती. ती मागणी पूर्ण झाल्याने आमदार मात्र समाधानी असल्याचं बोललं जातंय. थोडक्यात शिवसेनच्या आमदारांसह वरीष्ठ नेत्यांची सत्तेतून बाहेर पडण्याची सध्यातरी मानसिकता दिसत नाही. सत्तेतून बाहेर पडल्यानंतरही सरकार जर टिकत असेल तर सत्तेतून कशाला बाहेर पडा असंही शिवसेनेला वाटत असेल. त्यामुळेच दसरा मेळाव्यातही भाजपवर टीका केली असली तरी इशारा देण्यापलीकडे पक्षाने काही केलेले दिसत नाही.

COMMENTS