मुंबई – शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावरुन अडचणीत आलेल्या भाजपने आता पुन्हा शिवसेनेला कुरवाळण्याच्या प्रयत्न सुरू केलाय. विरोधकांच्या आक्रमाणाला शिवसेनेची साथ मिळत असल्याने सरकार अडचणीत सापडले आहे. त्यामुळेच आता पुढील आठवड्यात एनडीएची बैठक बोलवण्याचा निर्णय केंद्रातल्या भाजपनं घेतलाय. त्याचवेळी उद्धव ठाकरेंना भेटीचे निमंत्रण देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी अशा प्रकारारची एनडीएची बैठक बोलवण्याची मागणी केली होती. एनडीएतील घटक पक्षांना भाजप विश्वासात घेत नसल्याचीही टीका शिवेसेनेनं वारंवार केली होती. त्यापार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली आहे. त्याच बैठकीच्यावेळी उद्धव ठाकरेंनी हजर राहावे यासाठी त्यांनाही बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. आता या निमंत्रणाचा उद्धव ठाकरे स्विकार करतात का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS