मुंबई – शिवसेनेचे आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर येत आहेत. उद्धव ठाकरे आपल्या मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्यामुळे पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी 6 एप्रिलला पक्षाचे सर्वमंत्री आणि आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठक सेनेत खांदेपालट करत काही विद्यमान मंत्र्यांनाही डच्चू मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेना मंत्र्यांच्या असमाधानकारक कामगिरीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मंत्र्यांवर नाराज स्थानिक नेत्यांनी आणि आमदारांनी वारंवार शिवसेना पक्षप्रमुखांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. याची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी फोनवरून आमदारांशी संवाद साधला होता. त्यावेळी पक्षात चांगले बदल घडतील असे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले होते.
आता उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी 6 एप्रिलला पक्षाचे सर्वमंत्री व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नाराजीबाबत चर्चा होईल, असे बोलले जात आहे.
COMMENTS