उद्धव ठाकरेंकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता?

उद्धव ठाकरेंकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षांतर्गत मोठं फेरबदल करण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. नुकताच उद्धव ठाकरे यांनी पक्षातील आमदारांच्या कामाचा आढावा घेतला. त्यामुळं आमदारांनी दिलेल्या या अहवालाच्या आधारावर उद्धव ठाकरे पक्षातील नव्या चेहऱ्यांना राज्य मंत्रिमंडळात संधी देण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत आमदारांनी आपल्याच मंत्र्यांवर नाराजी व्यक्त करत चांगलेच सुनावले. सेनेच्या मंत्र्यांच्या कामगिरीवरही शिवसेनेचे आमदार हे नाराज आहेत. मतदारसंघात फिरताना लोकांनी आमदारांचे कपडे काढण्याचे बाकी राहिले आहे, अशा शब्दात सेनेच्या आमदारांनी मंत्र्यांवर संताप व्यक्त केला होता.

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारीच मातोश्रीवर पक्षातील सर्वच आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास उद्धव ठाकरे हे ग्रामीण भागातील नव्या चेहऱ्यानं संधी देणार का याची चर्चा सध्या सुरु आहे.

 

COMMENTS