उद्धव ठाकरे 25 जूनला पुणतांबेला जाणार

उद्धव ठाकरे 25 जूनला पुणतांबेला जाणार

मुंबई – शिवसेना भाजपमधील ताणलेले संबंधाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तब्बल 3 वर्षानंतर मातोश्रीवर जात आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेची मते भाजपने सुचवलेल्या उमेदवाराला मिळावीत यासाठी ते उद्धव ठाकरेंची मनधरणी करणार आहेत. तसंच सरकारच्या विरोधात शिवसेनेनं सुरू केलेल्या कडव्या विरोधाची धार कमी करण्यासाठी ते उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची शक्यता आहे. मात्र उद्धव ठाकरे मात्र आता काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याचं दिसून येतंय. कालच शाह यांचा मातोश्री दौरा ठरला असला तरी आज उद्धव ठाकरे यांनी पुणतांब्याला जाण्याचा निर्णय जाहीर केलाय. येत्या 25 जुनला ते पुणतांबेला जाणार आहेत. महाराष्ट्राच्या शेतकऱयांच्या वतीने पुणतांब्याच्या शेतकर्याचे आभार मानण्यासाठी आपण पुणतांब्याला जाणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. त्यानंतर ते 26 जुनला समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री आणि भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मात्र या मार्गाला मोठा विरोध होत आहे. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई नागपूर तीन महामार्ग असताना चौथ्या महामार्गाचा घाट का घातला जात आहे असं व्यक्तव्य केल्यानं या महामार्गाच्या विरोधाला धार आली आहे. त्यामुळे  उद्धव ठाकरे याही मुद्यावर विरोधांच्या सोबत असल्याचं दिसून येतंय.

COMMENTS