उद्यापासून चलनात येणार 200 रुपयांची नोट !

उद्यापासून चलनात येणार 200 रुपयांची नोट !

नवी दिल्ली – 200 रुपयांची नोट उद्यापासून चलनात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. 200 रुपयांची नोट चलनात आल्यामुळे नोटाबंदीनंतर निर्माण झालेला कॅश तुटवडा भरुन काढण्यात मदत मिळणार आहे.

अर्थ मंत्रालयाने नवी नोट चलनात आणणार असल्याची माहिती दिली असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटेची डिझाईन रिलीज केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अर्थ मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर मार्च महिन्यातच ही नवी नोट आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सुरक्षा चाचण्या आणि प्रिंटिंग प्रेसमधील क्वालिटी तपासल्यानंतरच ही नोट चलनात आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

रिझर्व्ह बँकेचे असे म्हणणे आहे की, 200 रुपयांची नोट व्यवहारात आल्यास फायदेशीर ठरेल आणि यामुळे नोटांची उपलब्धता सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे.

COMMENTS