उद्यापासून बळीराजा जाणार संपावर….

उद्यापासून बळीराजा जाणार संपावर….

उद्यापासून अनेक शहरात भाजीपाला,दूध आणि दैनंदिन आवश्यकता वस्तुंचा तुटवडा जाणवणार आहे, कारण उद्यापासून शेतकरी इतिहासात पहिल्यांदाच संपावर जाणार आहेत.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा,स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी. आदी मागण्यासाठी शेतक-यांनी संपाचा एल्गार पुकारला आहे. पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱयांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याने शेतकऱयांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS