15 आणि 16 एप्रिल रोजी कार्यकारिणी
युपी विजयानंतर पहिलीच राष्ट्रीय कार्यकारिणी
उडीसा मधील निवडणूकीची तयारी
पटनाईक सरकार घालण्याचे आव्हान
हिमाचल प्रदेश, गुजरात निवडणूकीवर नजर
भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी 15 आणि 16 एप्रिल रोजी भुवनेश्वर येथे आहे. युपी निवडणूकांनंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणी होत आहे. उडीसामध्ये 2019 मध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. या निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीचे आयोजन भुवनेश्वर येथे केले आहे. येथे मागील 17 वर्षापासून नवीन पटनायक यांचे सरकार आहे. पटनायक यांची सत्ता घालवून उडीसामध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे.
भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच मोठे मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित असतील. त्यामुळे दोन तीन दिवस उडीसामध्ये भाजपची चर्चा होईल. या बैठकीमुळे उडीसामध्ये भाजपसाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असं भाजपच्या नेत्यांना वाटतं. तसंच, उडीसा निवडणूकीत भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचा हा संदेश आहे. ज्या ठिकाणी भाजपचे सरकार नाही, तिथे अशा प्रकारे बैठका घेऊन वातावरण निर्मिती करणे ही भाजपची रणनीती राहीली आहे. युपी निवडणूकीपूर्वी अलहाबाद येथे राष्ट्रीय कार्यकारिणी घेण्यात आली होती. उडीसा विधानसभा निवडणूकीपूर्वी अन्य महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणूका आहेत. परंतू तिथे विजय संपादन होण्याची खात्री भाजपला आहे. मात्र, उडीसा मधील पटनाईक सरकार घालवणे हे सोपे नाही. त्याची पायाभरणी या राष्ट्रीय कार्यकारिणीत केली जाणार आहे.
काय होईल राष्ट्रीय कार्यकारिणीत…
– 1817 मधील पहिला स्वातंत्र्यलढा लढलेल्या ‘पाईका विद्रोह’ मधील योद्ध्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना नरेंद्र मोदी भेटणार आहेत.
– युवा, महिला आणि गरीब लोकांना डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम आखला आहे.
– या बैठकीत मोदी सरकारच्या कामांचा पाढा वाचला जाईल.
– या कामांचा प्रचार आणि प्रसार उडीसामध्ये केला जाईल.
– अशावेळी युपीतील विजयाबद्दल बैठकीत गुणगाण गायले जाईल.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपण घेतलेले निर्णय लोकांसमोर मांडतील.
– नवीन पटनाईक सरकारवर हल्ला करण्याची संधी यावेळी मोदी सोडणार नाहीत.
– हिमाचल प्रदेश मधील निवडणूकाची तयारी केली जाईल.
– माफीया राज हटाओ, प्रदेश बचाओ, मोहीम आखली जाईल.
भाजपचे ओडीसामधील काम..
– आडीच वर्षापासून ओडीसा मध्ये भाजप कार्यकर्ता सदस्य नोंदणी सुरू आहे
– ओडीसामध्ये भाजप सदस्य नोंदवण्यात मोठा आकडा गाठला आहे.
– ओ़डीसामधील पंचायत निवडणूकीतही भाजपची ताकद दिसून आली.
– ओडीसा प. बंगालच्या जवळचे राज्य अाहे. बंगालमध्ये कमी ताकद असतानाही भाजप सक्षम विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आहे.
– ओडीसामध्ये ज्या जागांवर भाजप कमकुवत झाली, तिथे अमित शहा दौरे करण्याची रणनीती आखली जाऊ शकते.
COMMENTS