लातूर, परभणी आणि चंद्रपूर या तीन महापालिकांसाठी उद्या म्हणजेच 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. राज्यातील 10 महापालिकांच्या निवडणूकांच्या रणधुमाळीनंतर आता राज्यातील या तीन महापालिकांच्या निवडणूका होत आहेत. 201 जागांसाठी 1 हजार 285 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 7 लाख 92 हजार 720 मतदारांसाठी 1 हजार 19 मतदार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या तिन्ही ठिकाणी 21 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.
सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या तीनही ठिकाणच्या मतदानाची वेळ वाढवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. या तीनही ठिकाणी उद्या सकाळी 7.30 ते संध्याकाळी 6.30 असं तब्बल 11 तास मतदान करता येणार आहे. मतदान केंद्रांवर पुरेशा सावलीची व पाण्याची व्यवस्था करण्यात येँणार आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
दरम्यान, गेल्या निवडणूकांमध्ये भाजपने सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसंडी मारली होती. त्यामुळे आता या तीन महापालिकांमध्येही भाजपचं कामळ फुलणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
COMMENTS