उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मीना आयलानी यांची निवड झालीय. तर उपमहापौरपदी साई पक्षाचे राजू इदनानी यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेसोबत 6 पक्षांनी सभात्याग केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. कोकण आयुक्तांनी 31 मार्च रोजी साई पक्षाची गट म्हणून मान्यता रद्द केली असताना 3 तारखेला पुन्हा कोकण आयुक्तांनीच साई पक्षाला गट म्हणून पुन्हा मान्यता दिल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली. आयुक्तांच्या निर्णयाचा निषेध म्हणून शिवसेना आरपीआय तसंच इतर 4 घटक पक्षाच्या नगर नगरसेवकांनी महापौर निवडणुकीच्या प्रक्रियेवेळी सभात्याग केला.
COMMENTS