मोठ्या अपेक्षेनं लोकसभा निवडणुकीत मतदारांनी शिवेसनेचे रविंद्र गायकवाड यांना भरगोस मतांनी निवडूण दिलं. मात्र त्या अपेक्षेला खासदार साहेब उतरत नसल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. एवढच काय शिवसैनिक आणि तालुकापातळीवरील शिवसनेचे नेतेही उघडपणे नसली तरी खाजगी नाराजी व्यक्त करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून खासदार मतदारसंघात फिरकले नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. कोणत्याही कार्यक्रमास ते जिल्ह्यात दिसत नसल्याने कार्यकर्त्यातही नाराजी आहे. एखाद्या कार्यक्रमाला येणे अन् जिल्ह्याचा दौरा झाला असल्याचे दाखविणे, असा प्रकार सुरू असल्याची चर्चा कार्यकर्त्यांत दबक्या आवाजात सुरू आहे.
उपनेतेही गायबच
शिवसेनेचे उपनेते आमदार प्रा. तानाजी सावंत यांनीही उस्मानाबाद शहरासह विविध भागात विकास कामांची आश्वासने दिली होती. पालिकेच्या निवडणुकीत शहराअंतर्नगत बससेवा सुरू करण्याचे आश्वासन मतदारांना त्यांनी दिले होते. स्वतःची तर सोडाच, पण एस. टी. महामंडळ सेनेच्या ताब्यात आहे. महामंडळाची उस्मानाबाद शहराअंतर्गत बससेवा सुरू करण्यातही अपयश येत असल्याने नागरिकांची नाराजी ओढावून घेतली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर येऊन इतर वेळी गायब होणारे खासदार, उपनेते जिल्ह्यात पुन्हा येतील का, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
COMMENTS