गावातील एका महिलेच्या पतीचा खून केल्या प्रकरणी तालुक्यातील एका बड्या नेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्या महिलेशी अनैतिक संबंध ठेवण्यास तिचा पती अडसर ठरत होता. यापूर्वीही संबंधीत पुढाऱ्याने त्या पतीला दारू पाजून कायमचे पत्नीपासून दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा गावकऱ्यांत आहे. नाशिकमध्ये त्या पतीचा खून झाला. त्याचा चेहरा विद्रुप करण्यात आला होता. नाशिक हद्दीत हा प्रकार महिन्यापूर्वी झाल्यानंतर प्रेताची ओळख पटत नव्हती. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीपर्यंत पोहचण्यास यश मिळविले आहे. नाशिक पोलिसांनी जिल्हा बँकेच्या माजी संचालकास शुक्रवारी ताब्यात घेतल्याच्या माहितीस पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
COMMENTS