जिल्हा परिषदेत अध्यक्षपद ओबीसी वर्गाला आरक्षित आहे. त्यामुळे नेताजी पाटील यांची वर्णी लागली आहे. उपाध्यक्षपदी अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांची वर्णी लागली आहे. सभापतीपदांच्या निवडणुकीत चार पैकी तीन सभापती महिला वर्गाकडे गेले आहेत. विशेष म्हणजे सभापतीपदासाठी कोणतेही आरक्षण नसते. मात्र महिला बालकल्याण सभापतीपदासाठी प्रत्येक वेळी महिलेला संधी दिली जाते. शुक्रवारी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत महिला बालकल्याण सभापतीपद अपेक्षेप्रमाणे सखुबाई पवार यांच्याकडे गेले आहे. तसेच समाजकल्याण सभापती म्हणूनही चंद्रकला नारायणकर यांची वर्णी लागली आहे. तर कृषी सभापतीपदही महिलेकडे गेले असून आबिदाबाई जगताप या पदावर विराजमान झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयावर चर्चा होते. यामध्ये जिल्ह्यातील विविध विषयावरील अडचणी सोडविल्या जातात. तर सभागृहात व्यासपीठावर अध्यक्ष उपाध्यक्षांसह सभापतीही असतात. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत व्यासपीठारव सहा पैकी चार महिला असणार आहेत. त्यामुळे विरोधकांच्या आवाहनांना महिलाराज कशा प्रकारे सामोरे जातात. याची उत्सुकता असणार आहे.
COMMENTS