उस्मानाबाद – नियोजन समितीच्या जिल्हा परिषदेतील 19 जागा बिनविरोध निघाल्यानंतर पालिका विभागातून झालेल्या पाच जागांपैकी पाचही जागा राष्ट्रवादीच्या विरोधी गटाला मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध सर्वपक्षीय अशा लढाईत राष्ट्रवादीची हक्काची मतेही फुटली आहेत. एकूण 174 पैकी राष्ट्रवादीच्या हक्काची 72 मते होती. सर्वसाधारण गटासाठीच्या निवडणुकीत उस्मानाबाद पालिकेचे नगराध्यक्षम मकरंद राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील पाच ते सहा नगरसेवकांना आपल्या जाळ्यात ओढण्यात यश मिळविले आहे. तर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले संजय गाढवे यांच्या पत्नी संयोगीता गाढवे यांनी सौ. जाधव यांची 12 ते 14 मध्ये स्वतःच्या पारड्यात खेचून आणली आहेत. म्हणजेच राष्ट्रवादीची हक्काची 12 ते 14 मध्ये इतर पक्षाकडे वळल्याने पक्षातील अंतर्गत नाराजी वाढली असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थसत्ताही केंद्रबिंदू असल्याची चर्चा होती. परंतु, राष्ट्रवादीकडून याबाबत काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे पक्षातील प्रमुख कार्यकर्ते नेत्यांविषयी नाराजी व्यक्त करीत आहेत.
दरम्यान दुसरीकडे उमरगा विभागात मात्र काँग्रेसला एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रवादी विरुद्ध सर्वपक्षीय समिकरण असतानाही शिवसेना तसेच भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसच्या सौ. अंबर यांना मतदान केले नसल्याचे चित्र तयार झाले. राष्ट्रवादीचे रोचकरी व अंबर यांना समान मते पडल्यांनंतर टॉस केल्यांनंतर विजय अंबर यांच्या पारड्यात पडला. शिवसेना व भाजपने आपली मते स्वतःकडे मिळविल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस परस्परविरोधी हेव्यादाव्यामुळे जिल्ह्यात भाजप व सेनेचे फावल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेस आत्मचिंतन करणार का, असा प्रश्न आघाडीचे कार्यकर्ते विचारीत आहेत.
COMMENTS