उस्मानाबाद –  राष्ट्रवादीकडून लोकसभा, विधानसभेसाठी मोर्चेबांधणी, नियोजन समितीसह, जिल्हा बँकेवर युवकांना संधी !

उस्मानाबाद – राष्ट्रवादीकडून लोकसभा, विधानसभेसाठी मोर्चेबांधणी, नियोजन समितीसह, जिल्हा बँकेवर युवकांना संधी !

उस्मानाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसने नियोजन समितीसह जिल्हा बँकेत तरुण वर्गाला संधी देत दुसरी फळी मजबूत करून आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद अर्चनाताई पाटील यांच्याकडे दिल्यानंतर अंतर्गत नाराजीची सुप्त लाट राष्ट्रवादीत सुरू होती. त्यातच सभापतीपदही मिळाले नसल्याने अनेकजन नाराज झाले होते. दरम्यान नुकत्याच झालेल्या नियोजन समितीच्या सदस्यांमध्ये तरुण वर्गाला संधी देत नाराज वर्गालाही पुन्हा स्वतःच्या गोटात ओढून घेण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे.

गेली तीन टर्म जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिलेले महेंद्र धुरगूडे यांना नियोजन समितीवर स्थान मिळाले आहे. उपाध्यक्षपदाच्या शर्तीतही त्यांनी दंड थोपाटले होते. नियोजन समितीवर संधी देत धुरगुडे यांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे मराठवाडा युवती काँग्रेसच्या सक्षणा सलगर यांना सदस्यपदावर स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये त्यांचे स्थान चांगले असून खासदर सुप्रिया सुळे यांच्या त्या विश्वासू मानल्या जातात. मोहा मतदारसंघातील संदीप मडके यांनाही नियोजन समितीच्या सदस्यपदी स्थान देण्यात आले असून येणाऱ्या ग्रामपंयात निवडणुकीसाठी युवक राष्ट्रवादीला स्थान देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न विधानसभेच्या मोर्चेबांधणीची नांदी ठरत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रविण यादव यांना जिल्हा बँकेवर तज्ज्ञ संचालक म्हणून  नेमणूक करण्यात आली आहे. नियोज समिती आणि जिल्हा बँकेत युवक वर्गाला संधी देऊन दुसऱ्या फळी मजबूत  करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली आहे.

COMMENTS