उस्मानाबाद – पालकमंत्रीही नॉटरिचेबल

उस्मानाबाद – पालकमंत्रीही नॉटरिचेबल

जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दिपक सावंत बदलून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पदभार देण्यात आला. यातून शिवसैनिकात आनंदाचे वातावरण होते. रावते यांचा बाणेदारपणा जिल्ह्यातील सेनेच्या कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरेल, अशी अपेक्षा होती. परंतु, नवीन पालकमंत्री रावतेही जिल्ह्याकडे फिरकत नसल्याने कार्यकर्त्यांची निराशा होऊ लागली आहे .त्यातच शिवसेना उपनेते प्रा. तानाजी सावंत आणि रावते यांचे सूत जूळत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे सेनेतील अंतर्गत वादाची चर्चा सुरू झाली आहे. या वादामुळेच पालकमंंत्री जिल्ह्याकडे फिरकले नसल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात गारपीट होऊन मोठे नुकसान झाले. परंतु, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सेनेचे पालकमंत्री, मंत्री फिरकले नाहीत. पालकमंत्री बदलाने जिल्ह्यातील सेनेच्या नेत्यांना मोठी अपेक्षा आहे. परंतु, पालकमंत्र्यांचे फिरकणे बंद झाले आहे. तर उपनेतेही निवडणुकीनंतर जिल्ह्यातून गायब असल्याचे चित्र आहे. खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्यावर नाॅट रिचेबल असल्याचा शिक्का बसला असताना तसाच शिक्का आता पालकमंत्र्यांवर पडण्याची शक्यता दिसून येत आहे.

COMMENTS