उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीच्या पाच जागेसाठी मंगळवारी (ता. सहा) मतदान झाले. यात्रा अनुदान प्रकरणात अपहार केल्याप्रकरणी तुळजापूर पालिकेचे नगराध्यक्ष फरार आहेत. त्यांना न्यायालयाने अटक वारंट बजावले आहे. वरिष्ठ न्यायालयात जावून जामीन मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान मंगळवारी नियोजन समितीची निवडणूक झाली. ही निवडणूक चुरशीची होती. यामध्ये संबंधीत नगराध्यक्ष मतदार होती. पोलिसांना याची माहिती होती. तरीही याकडे दुर्लक्ष केले. जाणीवपूर्वक आरोपीला अटक करण्याच्या ऐवजी दुर्लक्ष केले. त्या मतदाराने मतदान करून निघूल गेला. एरवी एखाद्या सामान्य आरोपींने गुन्हा केल्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेतात. अटक करतात. किंबहुना मातीत गाडल्यानंतर उकरून काढण्यापर्यंत पोलिसांची मजल असते. परंतु, एखाद्या आरोपीला कशी सूट दिली जाते, हे मंगळवारी पाहायला मिळाले. संबंधीत आरोपी मतदानासाठी येतो काय, मतदान करून निघून जातो काय पोलिस यंत्रणा ही केवळ अर्थकारणावर चालते का, असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. यंत्रणेतील अशा डागाळलेल्यांवर कारवाई करण्याचे धाडस वरीष्ठ करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS