राष्ट्रवादी काँग्रेसचा भूम शहरातील एक बडा नेता भाजपच्या संपर्कात आहे. या नेत्याने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. यामुळे राष्ट्रवादीला या मतदारसंघात खिंडार पडण्याची शक्यता आहे. आमदार राहुल मोटे यांना हे मोठे आवाहन असणार आहे. गेली अनेक वर्षे या नेत्याने भूम पालिकेवर सत्ता गाजविली आहे. तालुक्यातही या नेत्याचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे या नेत्याचा भाजपप्रवेश आमदार मोटे यांना डोकेदुखी ठरण्याची चिन्ह आहेत. गेल्या दोन निवडणुकीत मोटे यांनी भाजप, सेना आणि काँग्रेस यांच्या मतविभाजनाचा फायदा मिळविला आहे. यातूनच त्यांनी विधासभेची विजयश्री खेचून आणली होती. येत्या आठवड्यात या नेत्याचा भाजपात प्रवेश निश्चित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
COMMENTS