उस्मानाबाद – 5 जणांसाठी 50 हजार वेठीला, एस टी महामंडळाचा उरफाटा कारभार !

उस्मानाबाद – 5 जणांसाठी 50 हजार वेठीला, एस टी महामंडळाचा उरफाटा कारभार !

शेतकरी आंदोलनच्या दरम्यान एसटी बसवर दगडफेक केली, या कारणावरून एसटी महामंडळाने चक्क मार्गावरील बसगाड्याच बंद केल्या आहेत. जिल्ह्यात एक जूनपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. सोमवारचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी शेतकरी आत्मक्लेश करीत स्वतःचा भाजीपाला तसेच दूध रस्त्यावर ओतून देत आहेत. दरम्यान सोमवारी महाराष्ट्रा बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्याला जिल्ह्यात एक दोन ठिकाणी हिंसक वळण लागलं. काही ठिकाणी एसटी बसेसवर तोडफोड झाली. याचा राग मनात धरीत महामंडळातील अधिकाऱ्यांनी या मार्गावरील बससेवाच बंद केली आहे. कळंब येडशी मार्गावर आठ ते नऊ छोटी मोठी गावे आहेत. दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून वसुली करावी. परंतु, दगडफेक करणाऱ्या पाच लोकांसाठी पन्नास हजार नागरिकांना वेठीस धरणारा हा कसला कायदा तयार केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हे परिवहन मंत्री आहेत. त्यांच्याकडेच एसटी महामंडळाचा कारभार आहे. त्यांच्या जिल्ह्यातही असे तुघलकी निर्णय घेतले जात आहेत. एकीकडे शिवसेना आंदोलनात उतरली आहे. तर दुसरीकडे आंदोलन का केले म्हणून बसगाड्या बंद करण्याचा निर्णय शिवसेनेच्या मंत्र्यांकडून केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

COMMENTS