ठिबक सिंचन असेल तरच यापुढे ऊस लागवड करता येणार. असा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.’ हा सरकारचा महम्मद तुघलकी निर्णय आहे. ठिंबक सिंचन सक्तीची भाषा चालणार नाही. सरकारने आगोदर मागेल त्याला ठिबक सिंचन द्यावे. कंपन्यांचा माल खपवण्यासाठी सरकारने असा निर्णय घेतला आहे’, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली.
‘ठिबक सिंचन असेल तरच यापुढे ऊस लागवड करता येणार अशी, सक्ती चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी ठिबक सिंचन धोरण का केले नाही ? सरकार आधीची राहीलेली सबसिडी का देत नाही ? ठिबक सिंचन कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. सरकार मधील काही मंत्र्यांशी कंपन्यांचे लागेबांधे आहेत. ठिबक सिंचन संच किती देणार हे ठरवावे.’ असे शेट्टी म्हणाले.
COMMENTS