उस्मानाबाद – कोण बावनकुळे ? असं म्हणणा-या अधिका-याला ऊर्जामंत्र्यांचा दणका !

उस्मानाबाद – कोण बावनकुळे ? असं म्हणणा-या अधिका-याला ऊर्जामंत्र्यांचा दणका !

उस्मानाबाद – कोण बावनकुळे ? असं उद्धटपणे बोलणा-या उस्मानाबाद येथील वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रकाश पौवनीकर यांना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलाच दणका दिला. आजच्या भर बैठकीतून पौवनीकर यांना बाहेर जाण्यास सांगितलं. तसंच पदधिकारी आणि सर्वसामान्य जनतेशी असाच ताठरपणा दाखवला तर गडचिरोलीला बदली करण्याचा इशारा मंत्र्यांनी दिला. पौवनीकर यांच्या कार्यपद्धीबद्दल पदाधीकारी आणि सर्वसामान्य व्यक्ती यांनी मंत्र्यांकडे तक्रीर केल्या. तसंच त्यावरत वर्तन सुधाराण्याचा सल्ला पौवनीकरांना दिला. वर्तनात बदल झाला नाही तर गडचिरोली किंवा नागपूरला बदली करतो, आणि मग यांचा ताठरपणा कसा उतरत नाही हेच बघतो अशा शब्दात बावनकुळे यांनी पौवनीकरांन खडसावलं. जिल्ह्यातील लाईनमन तसेच इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना दिले आहेत. परंतु, यासंबंधी परिपत्रक मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र पौवणीकर खोटे बोलत असल्याचे उघडकीस आणले. त्यानंतर चिडलेल्या उर्जामंत्र्यांनी अधीक्षक अभियंता पौवनीकरांना भर बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. बावनकुळे यांची कुळे काढणाऱ्या अधिकाऱ्यांला उर्जामंत्र्यांनी चांगलीच कुळ दाखविल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

COMMENTS