‘एकत्र येऊन सरकार बनवू’, अजित पवारांची शिवसेनेला ऑफर

‘एकत्र येऊन सरकार बनवू’, अजित पवारांची शिवसेनेला ऑफर

या सरकारने कर्जमाफी नाही तर कर्ज वसुली केली आहे, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. यावरच ते थांबले नाही, तर एकत्र येऊन सरकार बनवू आणि शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी देऊ, अशी ऑफर त्यांनी शिवसेनेला केली.

‘काँग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून 145 च्या आकड्याचे गणित जमवू आणि शेतकऱ्यांना सरसकट थेट कर्जमाफी देऊ.  मुंबई महाराष्ट्राची आहे, मुंबई अडचणीत असते तेव्हा महाराष्ट्र मदतीला धावतो. आता मुंबईने मदत करावी. शिवसेनेला खरंच शेतकाऱ्यांविषयी सहानुभूती असेल तर पालिकेच्या 60 हजार कोटींच्या ठेवी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी द्याव्यात’. असे आवाहनही पवारांनी शिवसेनेला केले.

‘सरकार दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करणार आहे. दीड लाख रुपयांच्या पुढील कर्ज शेतकऱ्यांनी भरले तरच त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, ही कर्जमाफी नाही तर कर्ज वसुली आहे. सरकार पतसंस्थांना पीककर्ज द्या, असे सांगते. त्याप्रमाणे पतसंस्थांनी कर्ज दिलेले आहे. मग आता पत संस्थांमधील शेतकऱ्यांचे पीककर्ज का माफ केले जात नाही, असा सवाल करत, सरकारने पतसंस्था आणि नागरी बँकांमधील शेतकऱ्यांचे कर्जही माफ केले पाहिजे’. असे पवार म्हणाले आहे.

 

COMMENTS