सायबर क्राईमच्या मुद्दयावरुन भाजपाचे नेते एकनाथ खडसेंनी गृहखात्यावर हल्लाबोल केला आहे. सायबर क्राईम रोखण्याबाबतच्या गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या उत्तरावर खडसे भडकले. ‘सायबर क्राईम रोखण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र कायदा करणार आहे का? सायबर क्राईमचा मी बळी आहे. दाऊदशी संबंध असल्याचे आरोप माझ्यावर केले, त्यात मी एक वर्ष त्रास भोगला आहे. माझ्यावरील हे आरोप बोगस निघाले. राज्यातील महिला आमदारही सुरक्षित नाहीत. महिला आमदारांना आलेल्या अश्लिल मॅसेजबाबत काय झाले’. असा सवाल एकनाथ खडसेंनी विचारत रणजित पाटील यांनाच अडचणीत आणले. सायबर क्राईमच्या मुद्दयावरुन खडसेंना विरोधकांनी यावेळी साथ दिली.
Older Post
उदयनराजेंच्या अटकेचे विधानसभेत पडसाद
COMMENTS