राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील हे एकनाथ खडसेंचे वैयक्तिक विश्लेषण आहे. असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज म्हटले आहे. राज्यात मध्यावधी निवडणूका डिसेंबर महिन्यात होऊ शकते असे काल माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाकीत केले होते.
सरकार स्थिर असल्याने मध्यावधी निवडणूक होण्याची कुठलीही शक्यता नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. ते कोल्हापूरात सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कार वितरण समारंभासाठी आले होते त्यावेळी बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या एका बैठकीत ही माहिती दिल्याचे एकनाथ खडसे काल म्हणाले होते. आगामी काळात गुजरात विधानसभेची निवडणूक होणार असून, त्याच बरोबर महाराष्ट्राचीही निवडणूक होऊ शकते, सत्ता स्थापन करून तीन वर्षांचा काळ लोटला. मात्र सरकारकडून कुठलीही धडक कामगिरी झाली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
COMMENTS