एकनाथ खडसेंचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या हॅकर भंगाळेला अटक

एकनाथ खडसेंचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या हॅकर भंगाळेला अटक

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप करणाऱ्या इथिकल हॅकर मनिष भंगाळेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
2014 ते 2015मध्ये मंगेश भंगाळेने हॅकिंग करुन दाऊदने कुणा-कुणाला कॉल केले होते, याची माहिती बाहेर आणली होती. त्यानंतर त्याने पत्रकार परिषद घेऊन माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि दाऊद यांच्या कथित कॉलप्रकरणी माहिती दिली.
पोलिस यंत्रणा इतर चार नंबरची माहिती काढत नाहीत. ही माहिती काढण्यास किंवा जाहीर करण्यास पोलिस यंत्रणा घाबरते का, सायबर सेल दबावाखाली आहे का ? असे प्रश्नही पोलिस यंत्रणेबद्दल इथिकल हॅकर भंगाळेने उपस्थित केले होते.  या आरोपांची चौकशी पोलीस करत होते. याच प्रकरणात पोलिसांनी आता मनिष भंगाळेला अटक केली आहे.

COMMENTS