पुणे – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खसडे यांना काल पुण्यात जाधवर इन्स्टिट्यूटच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. माजी खासदार के सी त्यागी यांच्या हस्ते या पुरस्कार देण्यात आला. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना खडसे यांनी त्यांच्या राजकारणातील सुरूवातीपासूनच्या ते आतापर्यंतच्या राजकीय प्रवासावर भाष्य केलं.
पक्ष वाढीसाठी आपण कसे कष्ट घेतले आणि तो काळ कसा होता तसंच जिल्ह्यातील काँग्रेसच्या दिग्गजांना कसा पराभव केला हेही खडसेंनी त्यांच्या भाषणात सांगितले. 1984 मध्ये जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुकरराव चौधरी यांनी आपल्याला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. तु या भाजीपाला पक्षात राहुन काय करशील. तुझ्या पक्षाचे आता फक्त 2 खासदार आहेत. तुमची सत्ता कधी येणार. त्याऐवजी तु काँग्रेसमध्ये ये तुला काही कुठल्यातरी महामंडळावर घेतो अशी ऑफर चौधरी यांनी दिल्याची आठवण खडसे यांनी सांगितली. मात्र आपण ती ऑफर नाकारली असंही खडसे पुढे म्हणाले.
COMMENTS