एकनाथ खडसे दिल्लीत, मंत्रीपदासाठी पुन्हा लॉबिंग ?

एकनाथ खडसे दिल्लीत, मंत्रीपदासाठी पुन्हा लॉबिंग ?

दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे दिल्लीत पोहचले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, राज्यमंत्रीमंडळाचा विस्तारही लवकरच होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर खडसे यांच्या दिल्ली भेटीला महत्व आलं आहे. खडसे हे दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत. भोसरी जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भोसरी प्रकरणाचा चौकशी अहवाल सरकारकडे आला असून, खडसे यांच्यावर काही ताशेरे ओढले असले तरी गंभीर आरोप नसल्याचं कळतंय. त्यामुळे मुख्यमंत्रीही खडसेंच्या मंत्रीमंडळातील समावेशाला उत्सुक असल्याचं बोललं जातंय. आता भाजपचे केंद्रीय नेते काय भूमिका घेतात यावर खडसेंच्या मंत्रीपदाचा निर्णय अवलंबून आहे.

COMMENTS